अझोला चारा निर्मीती


अझोला चारा निर्मीती

श्री. प्रदीप भोर
आजकाल कृषी क्षेत्रात शेतक-यांना आर्थिक नफा कमी मिळतो याची अनेक कारणे आहेत त्यापैकी निविष्टावरील खर्च व हमीच्या पाणी व्यवस्थापनाचा अभाव यामुळे शाश्वत शेतीस अडथळा येतो. शाश्वत शेतीस जोडधंद्याची जोड दिल्यास आधिक उत्पन्न मिळण्याचे साधन होईल. दुग्धव्यवसाय हा उत्तम जोडधंदा हा शाश्वत शेतीस आहे. परंतु या व्यवसायास चांगला चा-याची कमतरता भासते कारण भारतकडे जगाच्या 2.4 टक्के जमीन असुन 11 टक्के जनावरे आहेत. त्यात जगाच्या 55 टक्के म्हशी, 20 टक्के शेळी, आणी 16 टक्के गाई आहेत. याचा विपरित परिमाण पर्यावरणावर होतो म्हणुन ऑझोला हे चांगला पर्याय आहे.
ऑझोला हे पाण्यावर तंरगणारे शैवाळ असुन पाण्यावर चटई सारखे दिसते. याचा वापर भात पिकात नत्र स्थिरीकरणासाठी केला जातो तसेच वाळलेल्या ऑझोल्याचा वापर कुक्कुटपालनात आणि ओल्या ऑझोल्याचा वापर जनावरांसाठी चारा म्हणुन केला जातो.
ऑझोलाचे फायदे –
1- हिरव्या चाऱ्याची कमतरता भरुन काढते व गाईंच्या दूध उत्पादनात वाढ व त्यात सातत्य येते.
2- गाईच्या दूध उत्पादन कमी होत नाही.
3- दुधाला फॅट चांगले येते.
4- पेंडी वरील खर्चात बचत होते.
5- गाई वेळेवर माजावर येऊन गाभण राहतात.
6- गाईंच्या शरीरप्रकृतीत खूप सुधारणा होते.
7- चाराटंचाईच्या काळात गाईंना पोषक चारा मिळातो.
8- गाई ऑझोला आवडीने खातात.
पौष्टीक मुल्य –
ऑझोल्यात मोठ्या प्रमाणात प्रथीने (25-35 टक्के), कल्शीअम (67 मिग्री/100 ग्रम) आणि लोह (7.3 मिग्री/100 ग्रम) असते. ऑझोला व इतर चारा पिकाशी तुलनात्माक पौष्टीक मुल्यांचा तक्ता खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. परिमाण ओला चारा (मे. टन) सुकलेला चारा (मे. टन) प्रथिने (टक्के)
1 हा. नेपियर 250 50 4
2 लसुण घास 40 8 0.8
3 चवळी 35 7 1.4
4 सुभाबुळ 80 16 3.2
5 ज्वारी 40 3.2 0.6
6 ऑझोला 1000 80 24
उत्पादन प्रक्रीया –
ऑझोल्याचे नैसर्गिक पध्दतीने (भात खाचरात) उत्पादल फक्त 50 ग्रम/चौ.मी./दिवस तर कृत्रीम पध्दतीने (खड्डा) 400 ग्रम/चौ.मी./दिवस मिळते. हे उत्पादन कार्यक्षमता वाढ होण्यासाठी इतर शैवाळ्यांशी स्पर्धा आणि प्रादुर्भाव कमी केला पाहीजे. यासाठी ऑझोलाचे उत्पादन चरात कृत्रीम पॉलीथीन शिटचा वापर करुन भरपुर सुर्यप्रकाश असलेल्या मोकळ्या ठिकाणी घ्यावे.
सुरवातीला त्यांना ऑझोला निर्मीती करण्यासाठी वाफे तयार करावेत. प्रति गाईला दररोज 1.5 ते दोन किलो गरज असते. त्यासाठी 10 फूट लांब, सहा फूट रुंद व नऊ इंच खोल आकाराचे वाफे जमिनीमध्ये तयार करावे. वाफ्यांचा पृष्ठभाग समपातळीत करून घेवा. झाडांच्या मुळ्या व भुचर प्राणी प्लॅस्टिक पेपरमध्ये जाऊन पेपर खराब होऊ नये म्हणून खताचे बारदान अंथरूण घ्यावे. त्यानंतर वाफ्यावर प्लॅस्टिक पेपर टाकवा. वाफ्याच्या बाहेरील प्लॅस्टिकवर माती टाकून घ्यावा. वाफ्यात अंथरलेल्या प्लॅस्टिक पेपरवर 15 ते 20 किलो खडेविरहित मातीचा थर द्यावा. त्या थरावर तीन किलो ताजे शेण पाण्यात मिसळून टाकावे. नंतर त्यावर 30 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 30 ग्रॅम क्षार मिश्रण टाकून वाफ्यात पाणी सोडावे. पाण्याची पातळी 8 ते 10 सें.मी.पर्यंत ठेवावी. त्यानंतर एक किलो ऑझोला कल्चर वाफ्यातील पाण्यावर सोडावे. अशाच प्रकारे दुसरे वाफे तयार करावे.
आता सर्व ऑझोला वाफा पूर्णपणे भरल्यानंतर व ऑझोलाची वाढ झाल्यानंतर तो काढण्यास सुरवात करावी. दररोज प्रत्येक वाफ्यातून 1.5 ते दोन किलो ऑझोला झाऱ्याच्या साह्याने काढले व पाण्याने धुऊन घ्यावे. हे पाणी वाफ्यामध्ये टाकावे. सुरवातीला ऑझोला खुराकात मिसळून गाईंना द्यावा. नंतर गाई तो स्वतंत्रही खातात.
घेवायाची काळजी
1. चांगल्या उत्पादनासाठी बिजगुणवत्ता उत्तम ठेवावी.
2. ऑझोल्याची काढणी वेळेवर करावी दाटी टाळावी.
3. तापमान ही ऑझोल्याच्या वाढीसाठी महत्वाची बाब असल्याने 35 सें. च्या आसपास तापमान राखावे. थंडीत पॉलीथीनचा वापर करुन तापमान नियंत्रीत ठेवावे.
4. ऑझोला उत्पादनाची जागा सुर्यप्रकाशाची असावी सावलीची असल्यास उत्पादन कमी येते.
5. पाण्याचा सामु 5.5 – 7.0 नियंत्रीत ठेवावा.
6. आवश्यक मुलद्रव्ये, खते, शेणगारा, इ. चा गरजेनुसार वापर करावा.

आर्थिक ताळेबंद –
अ.क्र. तपशिल परिमाण दर रक्कम
1 चराची निर्मिती 2 संख्या रु. 160/- 160.00
2 पॉलीथिन कागद 2 संख्या रु. 600 1200.00
3 सेंद्रीय माती 15 किलो/चर रु. 160/- 160.00
4 गाईचे शेण 5 किलो/चर रु. 10 100.00
5 खत
एस.एस.पी.
सुक्ष्म मुलद्रव्ये
5 किलो/चर
2 किलो/चर
रु. 15
रु. 50
150.00
200.00
6 ऑझोलो बिज 1 किलो/चर रु 100 200.00
7 शेडनेट 100 चौ.मी. रु. 5 500.00
8 इतर 330.00
एकुण 3000.00

Have any Question or Comment?

One comment on “अझोला चारा निर्मीती

Laxman Zinjurke

nice

Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.